-दररोज येतात १० हजार प्रवासी
-रविवारी केवळ ५३ प्रवाशांची एंटीजन टेस्ट
नागपूर- डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर येणाèया प्रवाशांकडे कोरोना लस प्रमाणपत्र qकवा ७२ तासापुर्वी केलेली आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र तपासण्याची व्यवस्था आहे. विदेशी प्रवाशांच्या चाचणीसाठी मनपाचे पथक २४ तास काम करते. परंतु नागपूर रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानकावर अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच चाचणी केली जाते. रविवारी केवळ ५३ प्रवाशांची एंटीजन चाचणी करण्यात आली.
मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोरच मनपा आरोग्य विभागाचे चारचमुचे एक पथक आहे. या ठिकाणी एंटीजेन चाचणी केली जाते. कोरोना लाटेदरम्यान २४ तास चाचणी केली जायची. दिवसा आरटीपीसीआर तर रात्री एंटीजेन चाचणी केली जात होती. दरम्यान लाट ओसरली आणि परिस्थिती सामान्य झाल्याने आता केवळ दिवसा एंटीजन चाचणी केली जाते.
अलिकडे ओमिक्रॉन नावाचा नवीन व्हेरीयंट मिळाल्याने चाचणी आणि लसीकरणाला गती मिळाली आहे. त्यानुसार नागपूर विमानतळावर मनपाचे पथक २४ तास सज्ज आहे. परंतु नागपूर रेल्वे स्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकावर अशा प्रकारची व्यवस्था दिसत नाही. केरळ, कर्नाटक आणि मुंबईत ओमिक्रॉनचे रूग्ण मिळालेत. या भागातून रेल्वेने नागपुरात हजारो प्रवासी येतात. त्यासर्वांची चाचणी करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे.
मनपा आरोग्य विभागातील डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नुसार रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रेल्वे कर्मचारी असतात. केरळ, कर्नाटक आणि मुंबईहून येणाèया प्रवाशांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र, ७२ तासापूर्वी चाचणी केल्याचे प्रमाणपत्र याची विचारपूस व्हायला पाहिजे. यासाठी रेल्वे कर्मचाèयांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. मात्र, पाहिजे त्या प्रवाशांकडून विचारपू केली जात नाही. त्यामुळे दररोज सरासरी केवळ ५० प्रवाशांची चाचणी होते आहे. ओमिक्रॉनच्या पुष्ठभूमिवर हे प्रमाण वाढायला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर चोवीस तास प्रवासी येत असतात. चाचणी करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. केवळ चार कर्मचारी असतात. सायंकाळपर्यंत तपासणीचे काम बंद होते. त्यानंतर येणाèया प्रवाशांचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
एका चाचणीसाठी ८०० रूपये खर्च
मिळालेल्या माहिती नुसार एक आरटीपीसीआर चाचणीसाठी ८०० रूपये खर्च येतो. शासनाकडे येवढा फंड नाही, रेल्वे स्थानकावर येणाèया सर्व प्रवाशांची चाचणी करता येईल. त्यामुळे रेल्वे स्थानकावर आरटीपीसीआर चाचणी होत नाही. या ठिकाणी ५ टक्के म्हणजे दररोज ५०० प्रवाशांची चाचणी होने अपेक्षित आहे. मात्र, ५० qकवा त्यापेक्षा थोडेफार अधिक प्रवाशांची चाचणी होते.