बखारी येथे जिवंत नाल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यावतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील मौजा बखारी येथे जिवंत नाल्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी यांच्यावतीने श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला . रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व परिसरातील जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पारशिवनी तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी.गच्चे  यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा निर्माण करण्यात आला यावेळी मंडळ कृषी अधिकारी कन्हान जी.बी.वाघ ,कृषी सेवक बखारी, पी.एम.गटकाळ, बखारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भिवगडे , बाजनघाटे रोजगार सेवक , परिसरातील शेतकरी बंधूं यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोमवार से तालुका की 22 ग्राम पंचायतों पर प्रशासक राज 

Thu Nov 24 , 2022
पारशिवनी :-  पंचायत समिति के अंतर्गत आने वाली 22 ग्राम पंचायतों का कार्यकाल सोमवार से समाप्त हो गया है, इसलिए पंचायत समिति की धारा 35(3) के तहत 22 ग्राम पंचायतों पर प्रशासक नियुक्त किया गया है. जनहित और प्रशासनिक मामलों के सुचारू संचालन के लिए महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1959 अर्तगत यह जानकारी पंचायत समिति की गट विकास अधिकारी सुभाष जाधव, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com