यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात सहाय्यक आयुक्त प. भ. जाधव हे आज रुजू झाले. अतिरिक्त पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसी संवाद साधला.
सहायक आयुक्त जाधव यांचे पदभार स्विकारल्यानंतर कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. अधिकारी, कर्मचारी यांना संबोधित करतांना जाधव, यांनी कार्यालयातील कामकाजाच्या विविध योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेत कार्यालयातील कामकाज अधिक गतीमान करण्याबाबत मार्गदर्शन केले.