चंद्रपूर :- मतदार ओळख पत्रासोबत आधार कार्ड जोडणी ही पुर्णपणे ऐच्छिक असुन महानगरपालिका क्षेत्रात सर्वांचे मतदार ओळखपत्र आधार कार्ड सोबत जोडणी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत सभेत केले.
१ ऑगस्ट २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडणे या मोहिमेस शासकीय प्रयत्नांबरोबरच विविध समाजघटकांचा सहभाग अपेक्षीत असल्याने विविध राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, सदस्य, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, मनपाचे सर्व माजी पदाधिकारी, सदस्य यांची सभा मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.
मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्यास मतदारांनी त्यांचे आधार कार्डच्या क्रमांकाची माहिती संबंधित मतदान केंद्रांचे बुथ लेवल ऑफीसर (BLO) यांचेकडे फॉर्म नं.६ B भरून द्यावयाचे आहे. याशिवाय केंद्रीय निवडणुक आयोग यांचे द्वारा Voter Helpline App वर सुद्धा प्रत्येक मतदार यांना स्वतःचे,जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी यांचे आधार कार्ड मतदार ओळखपत्राला जोडणी करता येणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात सदर मोहीम युद्धस्तरावर सुरु आहे, मात्र नागरीकांचा मोहीमेस मिळणार सहभाग अल्प आहे. मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडल्यास भविष्यात मतदार यादीमधील दुबार मतदार, मयत, स्थलांतरीत तसेच बोगस मतदार यांना पायबंद बसुन मतदार यादी त्रुटीविरहीत होण्यास मदत मिळणार आहे.