नागपूर :- महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर हे उद्या गुरुवारपासून (दि.२२) दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येत असून, ते महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत.
अँड. नार्वेकर यांचे सकाळी सव्वाअकराला वाजता नागपूर येथे आगमन होईल. येथील विधानभवनात दुपारी १ वाजता महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशन-२०२२ च्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर दुपारी दोनला विधानसभा सभागृह, तसेच रविभवन, नाग भवन व आमदार निवास आणि येथील इतर अधिकारी-कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेसंदर्भात ते पाहणी करतील. नागपूर येथे रात्री मुक्कामी राहणार आहेत.
शुक्रवार (दि. २३) रोजी सकाळी १० वाजता स्मृती मंदिर परिसर येथे भेट देतील आणि दुपारी साडेतीनला विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.