आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी

विविध राज्यातील गुणवंत सॉफ्टबॉल खेळाडूंचे शहरात आगमन

नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय पुरुष व २३ वर्षांच्या खालील सॉफ्टबॉल संघ निवडण्यासाठी दिनांक ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर मैदानावर राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणी स्पर्धेचे शनिवारी (ता.११) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

            कार्यक्रमात विशेषत्वाने खासदार डॉ.विकास महात्मे आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, स्पर्धेचे आयोजक नागपूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर देशमुख, बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, रा.काँ. पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेने गटनेता किशोर कुमेरिया, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका संगीता गि-हे, नगरसेविका अर्चना पाठक, नगरसेविका गार्गी चोपरा, नगरसेवक भूषण शिंगणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, ज्येष्ठ समाजसेवक चंदनसिंग सेटेले, उपअभियंता लोककर्म सूरज बोरोले यांची उपस्थिती असेल.

            आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्यप्राप्त उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या सॉफ्टबॉल खेळाडूंचे नागपूर शहरात आगमन झाले आहे. सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होउन आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडू पुढील दोन दिवस आपल्या कौशल्य व क्षमतांची परीक्षा देतील.

            २३ वर्षाच्या खालील पुरुष आशियाई स्पर्धा सिंगापूरमध्ये होणार असून या स्पर्धेतील पहिले दोन संघ अर्जेंटिनामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. तर वरिष्ठ गट पुरुष आशियाई स्पर्धा जपानमध्ये होणार असून त्यातून पात्र होणारे संघ न्यूझीलंडला नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धा खेळतील.

            या निवड चाचणीसाठी भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे महासचिव एल.आर. मौर्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रविण अनावकर, महाराष्ट्र संघटनेचे सचिव डॉ. प्रदिप तळवेलकर तसेच तज्ञ निवडकर्ता मंडळी उपस्थित राहणार आहेत.

            स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे उपायुक्त (क्रीडा) विजय हुमने, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे यांनी आवाहन केले आहे.

            सदर निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी नागपूर जिल्हा संघटनेचे खेळाडू, कार्यकर्ते डॉ. सुरजसिंग येवतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेत आहेत. सदर निवडचाचणी स्पर्धेसाठी विविध समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत.

            निवड चाचणी स्पर्धेसाठी आयोजक नागपूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर देशमुख, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशने सचिव प्रदीप तळवळकर, डॉ. विवेक अवसरे, डॉ. सुरजसिंग येवतीकर, डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. दर्शना पंडीत, डॉ. माधवी मार्डीकर, डॉ. जयंत जिचकार, डॉ.छाया पार्टील, विनोद सुरदुसे, डॉ.विवेक शाहू, डॉ.चेतन महाडिक, डॉ.श्रीधर गाडगीळ, केतन ठाकरे, निखिल वाहणे, योगेश बन, काजी सर, संतोष बोके, विशाल लोखंडे आदी सहकार्य करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

'पायी चालण्याचा अधिकार' जनजागृती अभियानाचा महापौरांनी केला शुभारंभ

Fri Feb 11 , 2022
मनपा, युवा दौड मंच, समनेट इंडिया यांचा संयुक्त उपक्रम : प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला जनजागृती नागपूर, ता. ११ : नागपूर शहरातील फुटपाथ, रस्त्यांवरून नागरिकांना मोकळेपणाने चालता यावे, प्रत्येकाने पायी चालावे, प्रत्येकाला तसा अधिकार आहे. या जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ‘पायी चालण्याचा अधिकार’ या अभियानाचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी (ता.११) मेडिकल चौक येथून शुभारंभ केला. यावेळी महापौरांनी मेडिकल चौक ते अशोक स्तंभ चौकापर्यंत चालून जनजागृती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!