संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- थोरपुरुष विचारमंच मित्र परिवार टेकाडी व्दारे आष्टे डु मर्दानी आखाडा स्पर्धेत, शालेय, विद्यापीठ व खासदार क्रीडा महोत्सवा मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनीं व नवनिर्वाचित टेकाडी (को.ख) ग्रा पं सदस्याच्या आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री हनुमान मंदीर चौक टेकाडी येथे थोर पुरुष विचार मंच टेकडी द्वारे आयोजित सत्कार सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षेत, प्रमुख अतिथी आष्टे -डु मर्दानी आखाडा महाराष्ट्र सचिव राजेश तलमले, ग्रा प टेकाडी सरपंच विनोद राधेलाल इनवाते ,उपसरपंच जितेंद्र चव्हाण आदीच्या प्रमुख उपस्थित पुजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. रामसरोवर शितला माता मंदीर टेकाडी येथे गुरूकृपा मर्दानी आखाडा प्रशिक्षक निलेश गाढवेच्या मार्गदर्शनात सराव करणारे शिवकाळीन आष्टे -डु मर्दा नी आखाडा चे शिष्य शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत प्राची टाकळखेडे (स्वर्ण पदक), विद्यापीठ स्पर्धेत अनिकेत निमजे (रजत), निकिता बेले (रजत), दिशा चव्हाण (कास्य), खासदार क्रीडा महोत्सवात अमोल कांबळे (स्वर्ण), श्रेया हूड (रजत), अनिकेत निमजे (रजत) आदीचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुष्प व सन्मानपत्र देऊन व उत्कृष्ट खेळा साठी विशाल सातपैसे, सुरज चव्हाण, सिद्धार्थ सातपैसे, आदेश आंबागडे, पूर्वेशे नाईक, उज्वल कांबळे, मोहित सावरकर, मनिष वागोदे, कुणाल कांबळे, निधी नाईक, श्रेया हुड, मोनाली आखरे, सोनल गुरधे, राणी गुरधे, जानवी सातपैसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रा पं टेकाडी नवनिर्वाचित सदस्य सचिन कांबळे , कुणाल वासाडे, तारखेश्वरी मोरे, शीतल सातपैसे, अर्चना वासाडे यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुंदर आयोजना करिता बावनकुळे यांनी थोर पुरुष विकास विचार मंच संस्थापक अध्यक्ष प्रविण सूर्यभान चव्हाण यांचे कौतुक करित ग्रा पं टेकाडी (को.ख) ला दरवर्षी ५० लाख रुपयांच्या निधी जाहीर करून राम सरोवराच्या विका साची संपुर्ण जबाबदारी घेत आश्वस्त केले. कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी पंढरी बाळबुधे, नाना कांबळे, देवेंद्र सिंगर, विनोद सातपैसे, बाळु सातपैसे, राजु बेले , शिवकृपा आखाडा कन्हान अभिजीत चांदुरकर, शिवगर्जना युवा फाउंडेशन केरडी चे सचिन खंडार, विकी खंडाळ, आदित्य ठाकरे, संजय भोयर सह टेकाडी ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.