संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक भगिनी नी १२ जानेवारी पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला. असुन जोपर्यंत मंजुर केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय निघणार नाही तो पर्यंत संप चालु राहणार आहे.
राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका व प्रवर्तक भगिनींनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ मध्ये २३ दिवसाचा संप केला. तेव्हा आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री, सचिव, आयुक्त यांच्यासोबत संपा च्या वाटाघाटीच्या बैठका कृति समिती सोबत झाल्या. आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजार रुपये व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजार रुपये वाढ तसेच दोन हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे जाहीर केले. परंतु अद्याप शासन निर्णय काढण्यात सरकार चालढकल करत आहे. हे एक प्रकारे आश्वासन देऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा विश्वासघात केल्या सारखे आहे. जी.आर. काढण्याकरिता वेळोवे ळी आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री यांना कृती समितीने भेटुन निवदन देऊन चर्चा सुद्धा केली.
परंतु राज्य शासनाचा वेळकाढुपणा चालु आहे. म्हणुन ऑनलाइन कामावर ती बहिष्कार व १२ जानेवारी २०२४ पासुन राज्यव्या पी बेमुदत संपाची नोटीस सुद्धा शासनाला १४ दिवसां पूर्वी दिलेली आहे. तरी अद्याप जी.आर. निघालेला नाही. त्यामुळे नाईलाजाने १२ जानेवारी २०२४ पासुन राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे. तरी राज्या तील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनी दि.१२ जानेवारी पासुन काम बंद ठेवुन संपात सहभा गी व्हावे. जोपर्यंत मंजुर केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय निघणार नाही तो पर्यंत संप चालु राहील. असे आवाहन म रा आरोग्य खाते आशा- गटप्रवर्तक कर्मचारी संघटना व कृति समिती- सरचिटणिस (आयटक) काॕ. श्यामजी काळे हयानी केले आहे.