संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 25:- ‘आशा’या आरोग्य यंत्रणा व नागरिक यांच्यातील महत्वाचा दुआ आहे.त्यामुळे आशांनी शासनाच्या आरोग्यविषयक योजना नागरिकांपर्यंत पोहोचव्यात असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले.
कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कामठी व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा,गुमथी, भुगाव व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामठी च्या वतीने येथील रणाळा स्थित साबळे सेलिब्रेशन सभागृहात आयोजित राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा दिवस-2022 कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा परिषद चे वैद्यकीय अधिकारी डॉ मोटे,कामठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे,रणाळा ग्रा प सरपंच सुवर्णा साबळे, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे आदी उपस्थित होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांनीही आशा दिनावर समयोचित असे मार्गदर्शन केले .
.आशा स्वयंसेविका नियमित आरोग्य सेवा पूरवीत असतात, त्या अनुषंगाने आशा स्वयंसेविकांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध व्हावी, आशा स्वयंसेवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच आशा स्वयंसेविकाच्या भूमिका व जवाबदारी बाबत जनमानसात जागृती निर्माण व्हावी याकरिता तालुका स्तरावर आशा दिवस साजरा करण्यात आला.
यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होते.सर्व आशा व गटप्रवर्तक स्वयंसेविका यांच्या रांगोळी, नृत्य अशा 8 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.विजेत्या आशा स्वयंसेविकांना व उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुछ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथळा, गुमथी, भुगाव तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामठी च्या समस्त कार्यलयीन कर्मचाऱ्यानी.मोलाची भूमिका साकारली.
आशांनी शासनाच्या आरोग्यविषयक योजना नागरिकांपर्यंत पोहोचव्यात-डॉ संजय माने
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com