माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सामोरे जात असताना युवा वर्ग अतिशय सुजाण झालेला आहे. भारतासारख्या सर्वात मोठ्या देशात लोकशाही जिवंत आहे याचे कारण विविध भाषा, विविध जाती, धर्म आणि प्रत्येकाची आपली वैचारिक भूमिका मांडण्याची “शक्ती” ही केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मिळते याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमानच आहे. आजच्या युगातील ग्रामीण किंवा शहरी भागातील युवा वर्गाला “आस्थेच्या” नावाखाली “अंधश्रद्धा” दिली जाते आणि मग हा युवा वर्ग भरकटतो तर कधी बळी पडतो यातून आर्थिक व शारीरिक नुकसान होते. या विरोधात जर कोणी आवाज उचलला तर तो आवाज कसा दाबायचा याकरिता राज्यकर्ते (कोणत्याही पार्टीचे नेते), प्रशासन मिळून वैचारिक भूमिका मांडण्याआधी याचा अंत कसा होईल हा विचार रोवतात. याकरिता पुढारी प्रशासनावर दबाव टाकतात. या प्रकारे संविधानाची एका अर्थाने पायमल्ली होत नाही का ? दुसरीकडे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या लोकांना अशा कृतीतून अधिकच बळ मिळते.
एप्रिल 17 “राम नवमी”चा दिवस इतवारी भाजीमंडी, येथे महाप्रसादाचा आयोजन होते तेथे असाच प्रकार घडला, मंदिरातील पुजाऱ्याच्या विषयी दोन माणसांनी प्रसादाची प्लेट न मिळाल्याने प्रसाद वाटणाऱ्या तरुणाला चिडून प्रश्न केला की, या मंदिराचा पुजारी मंगळवारी, शुक्रवारी अनुष्ठानाच्या नावाखाली पैसे घेऊन संध्याकाळी अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतो, तुला याची जाण आहे का ? तरुणाने लगेच दोन प्लेट दिल्या व आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती केली आणि बोलला की या पुजाऱ्याला मी लहानपणा पासून ओळखतो. लोकांचे चांगले होते म्हणून लोक येतात हा पुजारी त्याकरिता पैशाची डिमांड करत नाही व कोणाला बोलवायला जात नाही. आपण प्लेट न मिळाल्याने याला अंधश्रद्धेचा रंग देऊ नका. यावर त्या दोन माणसांनी म्हटले की, तुला विश्वास बसत नसेल तर आम्ही इथेच उभे राहतो तू “अंधश्रद्धेचा” विषय त्याच्या जवळच्या लोकांसमोर व पुजाऱ्यासमोर बोल, तुला त्याचे लगेच उत्तर मिळेल. तरुण बोलला की मी नक्कीच विचारणा करील. तितक्यात तरुणांला त्याच्या मित्राने हाक मारली, हाकेला प्रतिसाद देत हा तरुण मागील रूममध्ये प्रसाद खायला गेला. तेथे पुजाराच्या मुलाने रूममध्ये प्रसाद खाऊ नये याकरिता आरडाओरडा केला. यावर त्या तरुणांनी आरडाओरड करू नको मी याला बाहेर घेऊन जातो असे बोलला व जात असताना बाहेर दोन माणसं अंधश्रद्धेवर बोलले असे त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होता पण पुजाऱ्याच्या मुलाला वाटले की अंधश्रद्धेवर हाच तरुण बडबडतो आहे व त्याने चतुराईने बाहेर येऊन आम जनतेसमोर रूममधल्या खाण्याच्या प्रसंगावर वाद तयार केला व धक्काबुक्की केली व हळू आवाजात अंधश्रद्धेवर बोलशील का अशी ताकीद दिली, त्या दोन माणसांनी हा प्रकार बघून लगेच 112 वर कॉल करून तरुणांच्या मदतीसाठी पोलिसांना हाक मारली. काही वेळानंतर पोलीस तिथे आली तरुणाला व पुजाऱ्याच्या मुलाला स्टेशनमध्ये बोलवले. पुजाराच्या मुलाने माफी मागितली, माफी मागत असताना तिथे देखील अंधश्रद्धेवर बोलणारे दोन तरुण उभे होते. त्यावर पुजाराच्या मुलाची बोलती बंद झाली.
अंधश्रद्धेचा विषय पेटला तर वडिलांचे नुकसान होईल याकरिता पुजाऱ्याच्या मुलांनी माफी मागून वाद क्षमवन्याचा प्रयत्न केला. तरुणाला वाटले की लहानपणापासून त्या मंदिरात दर्शन करायला जात असल्याने याला इथेच पूर्णविराम दिलेला बरा व तो निघून गेला.
या प्रकाराने प्रश्न उपस्थित होतात…
१. पुजाऱ्याचा मुलगा अंधश्रद्धेच्या नावावर इतका का चिडला?
२. त्या दोन माणसांना या अंधश्रद्धेवरील माहिती असल्याने त्यांनी योग्य ती माहिती दिली नाही आहे का?
३. पोलिसांच्या डायरीमध्ये या प्रसंगाची नोंद आहे का, प्रसंग घडल्याच्या दुसऱ्या दिवशी काही समाज बांधवांनी येऊन पोलीस मध्ये तक्रार केली होती याची दखल पोलिसांनी घेतली का?
४. तरुण किंवा ते दोन माणसं खोटे बोलले असे गृहीत धरले तर पोलिसांचा खुफिया विभाग याबाबतची माहिती एकत्रित करू शकत होता का?
वरील प्रसंगाने देशात वैचारिक अधिकार नाही आहे का?
गौरी लंकेश, कुलबर्गी, पानसरे, दाभोलकर या सगळ्यांची हत्या, त्यांच्या विचार मांडण्याच्या भूमिकेला थांबवण्यासाठी झाली आहे ना, मग असे प्रकार घडत असताना पोलीस यंत्रणा सावध का होत नाही ?
सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक अंधश्रद्धेवर नेहमी प्रहार करतात. पण “आस्थेच्या” नावाखाली त्यांचा बळी जातो, खोट्या तक्रारी होतात, त्यांना फसविले जाते आणि हे सर्व आस्थेच्या नावावर हे अंधश्रद्धा फैलवणारे घडवून आणतात, पण पोलीस यंत्रणा तर सजग असायला हवी. त्यांना या विषयाचे गांभीर्य का नसावे? हाच प्रश्न सर्व युवकांना पडला आहे.
“राम नवमी” हा दिवस जरी देशात उत्सवाचा होता, तरी प्रभू रामचंद्राचे जनकल्याणकारी धोरण आपण राबवतो आहे का?
आज जवळपास 13 दिवस झाले पोलिसांना निवडणुकीच्या नावाखाली वेळच मिळत नसेल तर उद्या असले प्रकार सर्रास घडले तर समाज बांधव बघ्याची भूमिका घेतील कारण तरुणाला धक्काबुक्की करणाऱ्या या जमातीचे मनसुबे अधिक वाढले असेल, संविधान हातात घेऊन पोलिसांचा धाक नसणारी ही जमात उद्या तुमच्या आमच्या घरातील तरुणाला देखील मारेल हे विसरू नका !
– सौरभ चट्टे (युवा जागर)