लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्याने योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठीची प्रसार माध्यम प्रभावी – गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे प्रतिपादन

गोदिया येथे प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन

नागपूर/ गोंदिया :- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय तसेच जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया द्वारे आयोजित एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळेचे उद्घाटन आज गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते हॉटेल गेटवे गोंदिया येथे झाले. याप्रसंंगी गोंदीयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे , दैनिक भास्कर नागपूर आवृत्तीचे संपादक मानिकांत सोनी , गोंदिया जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते , पीआयबी नागपूरचे उपसंचालक शशीन राय प्रामुख्याने उपस्थित होते . केंद्र शासनाने गेल्या आठ वर्षात राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्याचप्रमाणे या योजनांमध्ये राहिलेल्या त्रुटी शासनाच्या निदर्शनास आणण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाचे असते . शासन व लोकांना आरसा दाखवण्याचे काम प्रसार माध्यम करतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ या नात्याने योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठीची देखरेख सुद्धा प्रसार माध्यम ठेवतात. प्रसार माध्यमामुळे शासनावर वचक राहतो .त्यामुळे लोकांच्या शासनाकडून अपेक्षा , योजनांची फलश्रुती या विषयावर प्रसारमाध्यम कार्यशाळेत चर्चा व्हावी अशी अपेक्षा गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केली . याप्रसंंगी गोंदीयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे , दैनिक भास्कर नागपूर आवृत्तीचे संपादक मनिकांत सोनी , गोंदिया जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते , पीआयबी नागपूरचे उपसंचालक शशीन राय प्रामुख्याने उपस्थित होते .

या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रानंतर पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या सहाय्यक संचालक निकिता जोशी यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या संदर्भात सादरीकरणाद्वारे माहीतीपुर्ण विवेचन उपस्थितासमोर मांडले .

या कार्यशाळेप्रसंगी आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत कर्करोगावर उपचार घेतलेल्या गोंदियाच्या ढाकणी गावातील लाभार्थी बबीता दशराम त्याचप्रमाणे हृदयविकारावर उपचार घेणारे दिलीप तमाने या लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासंदर्भात आपले अनुभव उपस्थितांसमोर कथन केले.

या कार्यशाळेत प्रसारमाध्यम प्रतिनिधीकरिता तज्ज्ञ व्यक्तीतर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .

पाश्चात्य देशात बहुतांश मुद्रीत माध्यम बाजारीकरणाच्या दृष्टीने वृत्ताकंन करत असतांना भारतीय प्रसारमाध्यम परिवर्तनासाठी पत्रकारिता करतात . अशी सुरुवात गोंदिया सारख्या आदिवासी बहुल , खनीज संपन्न जिल्ह्यातून झाल्यास येथील प्रलंबित विकास प्रकल्प , समस्या यांना प्रसारमाध्यमातून वाचा फुटेल आणि परिवर्तन घडू शकते, अशी अपेक्षा दैनिक भास्कर नागपूर आवृत्तीचे संपादक मनिकांत सोनी यांनी ‘ मुद्रीत माध्यमांची विकास संवादात भूमिका ‘ या विषयावर बोलतांना व्यक्त केली

पत्रकारांमध्ये समाजमन आणि राजकारण प्रभावित करण्याचे सामर्थ्य असते . आपल्या पत्रकारितेचा एक हिस्सा पत्रकारांनी समाज विकासासाठी देण्याचे आवाहन लोकमत समुहाचे वरिष्ठ संपादक विकास मिश्रा यांनी ‘ विकास संवादामध्ये पत्रकाराची भूमिका ‘ या विषयावर व्याख्यान देतांना केले. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची दुर्गम भागात माहिती पोहोचवण्याची क्षमता प्रभावी असते , असे मत ‘ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची विकास संवादात भूमिका ‘ यासंदर्भात बोलतांना दूरदर्शन रायपूरचे सहायक संचालक डॉ. मनोजकुमार सोनोने यांनी व्यक्त केले . या कार्यशाळेचे सूत्रसंचालन गोंदीयाचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले .

याप्रसंगी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही आपले विचार व्यक्त केले आणि प्रतिसाद संकलनाने कार्यशाळचा समारोप झाले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री संत गोरोबा काका प्रवेश व्दाराचे भूमिपूजन संपन्न

Wed Feb 8 , 2023
विदर्भ कुंभार समाज सुधार समितीच्या प्रयत्नाला यश अमरावती :-अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार नवनित राणा यांच्या विकासनिधीतून साकार होणारे नियोजित श्री संत गोरोबा काका प्रवेश व्दाराचे भूमिपूजन खासदारांचे प्रतिनिधी समाज सेवक सुनील राणा यांचे शुभ हस्ते श्री संत गोरोबा भवन शशीनगर बडनेरारोड अमरावती येथे कुंभार समाज बंधु-भगिनींच्या प्रचंड उपस्थितीत व शशीनगरवासी नागरिकांचे साक्षीने संपन्न झाले.            […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!