संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात यंदा अतिवृष्टी झाली आहे,सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यंदाच्या हिवाळयात जास्त प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता त्यात आता सत्यता आढळून आले आहे.
मागील दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असून तापमान 11 सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक गरम उबदार कपडे वापरण्यावर भर देत असून जागोजागी शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.त्याचप्रमाणे सकाळी ,सायंकाळी अनेक भागात शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून करण्यात येत आहे.ग्रामिण भागासह शहरात सुद्धा सकाळी, सायंकाळी नागरिक एकत्र येऊन शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक गरम कपडे परिधान करून दिसत आहेत.