जसे आरएसएस बिजेपीला सहकार्य करते तसे बामसेफ बीएसपीला सहकार्य करते – इंजि अरविंद माळी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 28 :- बामसेफ कामठी युनिट च्या वतीने कामठी शहरातील आकांक्षा सभागृहात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या . शिबिराला सत्यशोधक प्रबोधनकार नागपूर इंजि.अरविंदजी माळी यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करताना सत्यशोधक प्रबोधनकार इंजि.अरविंद माळी म्हणाले सामाजिक परिवर्तनासाठी बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी बामसेफ नावाची कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन केली, हि संघटना कर्मचाऱ्यांच्या समस्या साठी काम करणार नाही हे पण सांगितले होते. जसे आरएसएस बीजेपी ला सहकार्य करते त्याच प्रमाणे बामसेफ बहुजन समाज पार्टीला सहकार्य करते मान्यवर कांशीराम साहेबांनी म्हटले होते झाडाची मुळं म्हणजे बामसेफ आहे. शिबिराचे उद्घाटन बामसेफ विदर्भ प्रदेशचे संयोजक. राहुल लांडगे यांनी केले. प्रास्ताविक किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन बामसेफ कामठी युनिटचे संयोजक इंजि.रुपेश ब्राह्मणे यांनी केले . कामठी मध्ये बहुजन समाज पार्टीचा काम वाढू नये यासाठी मागच्या 15 वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हे प्रशिक्षण शिबिर होऊ नये ,फेल व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत तरीसुद्धा प्रशिक्षण शिबिर यशस्वी झाले. बहुजन समाज पार्टीचे स्टार प्रचारक मोहम्मद शफी, कामठी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष इंजि. विक्रांत मेश्राम यांचे सुद्धा बामसेफ युनिट कामठीचे संयोजक इंजि. रुपेश ब्राह्मणे यांनी स्वागत केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नवनिर्मित मोक्षधाम कामठीत भगवान श्री शिव मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा

Sun Aug 28 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठीता प्र 28 :- कामठी -अजनी मार्गावर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोक्षधाम कमिटी च्या साडे तेरा एकर जागेतील तीन एकर जागेत तीन करोड रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अद्यावत सर्वसुवीधा युक्त असलेल्या कामठी आजनी मार्गावरील नवनिर्मित मोक्षधामात श्री शिव भगवान शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी श्री गंज के बालाजी मंदिरातून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com