‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील अमृत कलशासह स्वयंसेवक रवाना

– जिल्हाधिका-यांची उपस्थिती

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात नागपूर जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १५ अमृत कलश आज जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील १३ पंचायत समिती, १ महानगरपालिका व सर्व नगरपालिका मिळून १ असे १५ अमृत कलश आज सायंकाळी नेहरू युवा केंद्राच्या ३० स्वयंसेवक आणि एका मार्गदर्शकासह मुंबईकडे रवाना झाले. मुंबईच्या आजाद मैदान येथे २७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होईल व त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील.

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानामध्ये अमृत कलशाच्या माध्यमातून जिल्ह्यातून एकत्र केलेली माती दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या अमृत वाटिकेत अर्पण केली जाईल. दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'अग्निवीर' अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Thu Oct 26 , 2023
मुंबई :- सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com