– धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात पडला खाली काळ आला होता, वेळ आली नव्हती
– नागपूर रेल्वे स्थानकावरील सकाळची घटना
नागपूर :-धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात त्याच्या हाताची पकड सैल झाली आणि तो खाली पडला. सुदैवाने फलाटावर पडला. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. पायदानाचा कोपरा कंबरेला लागल्याने तो जखमी झाला. त्याला लगेच मेयो रुग्णालयात दाखल करण्यात काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. अशी ही थरारक घटना मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली.
आर. डी. भारद्वाज (१६) रा. तामिळनाडू असे जखमी मुलाचे नाव आहे. तो १२ व्या वर्गात शिकतो. त्याचे वडील टपाल खात्यात आहेत. त्यांनी अयोध्या दर्शनाची योजना आखली. भारद्वाज, त्यांचे मित्र आणि त्यांचा मुलगा असे चार जण २२६१३ रामेश्वरम-अयोध्या एक्सप्रेसने निघाले. ए-२ डब्यातील २ आणि ३ बर्थवरून ते प्रवास करीत होते. मंगळवारी सकाळी गाडी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर आली. दरम्यान भारद्वाज यांचा मुलगा कॉफी पिण्यासाठी उतरला. कॉफी पिऊन होत नाही तोच गाडी पुढील प्रवासाला निघाली. करीत मुलगा गाडीत चढला. मुलाने पायदानावर चढून लोखंडी दांडा घट्ट पकडला. मात्र, गाडीची गती वाढत असताना त्याच्या हाताची पकड सैल झाली आणि तो स्वत:ला सावरू शकला नाही. काही क्षणातच तो खाली पडला.
दरम्यान फलाटावर उभे असलेले प्रवासी, आरपीएफ जवानांनी आरडाओरड केली. सुदैवाने तो फलाट आणि रेल्वे गाडीमधील गॅपमध्ये न फलाटावर पडला. यावेळी पायदानाचा कोपरा त्याच्या कंबरेला लागला. आरडाओरड होताच गाडी थांबली. लगेच लोहमार्ग पोलिस धावले. त्याला उचलून मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून, आता तो स्वस्थ आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या वडिलांचे बयाण नोंदविले आहे.