उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे नागपूर येथे आगमन

– नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी, एनएडीटीचा ‘प्रणिती’ कार्यक्रमात सहभागी होणार  

 – नागपुरात प्रथम आगमन, राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

नागपूर :- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे शुक्रवारी ४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता नागपुरात आगमन झाले. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. उपराष्ट्रपती एक दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला आले आहेत.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्ग, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, आदींनी स्वागत केले. उपराष्ट्रपतींसोबत त्यांच्या सुविद्य पत्नी सुदेश धनखड यांचेही आगमन झाले.

दुपारी 3.30 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी 5.30 वाजता ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एनएडीटीमध्ये सायंकाळी 5.30 नंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या या प्रबोधिनीमध्ये ते जवळपास तीन तास असतील. रात्री 9.20 वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपूरात असणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Fri Aug 4 , 2023
नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०३.०८.२०१३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पो. ठाणे सदर, सदर व पांचपावली नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अंकुश उर्फ मुंगुस वल्द नरेश मसराम, वय ३० वर्षे, रा. आदीवासी खदान वस्ती, गोंडवाना चौक, बैरामजी टाउन, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com