मुंबई :- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज दुपारी आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
यावेळी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.