उमरेड :- येथे दिनांक २२/०८/२०२३ रोजी उमरेड येथील फिर्यादी नामे १) प्रविण महादेव शस्त्रागार, रा. रहाटे लेआउट उमरेड, २) पियुष विकास वाघमारे रा. भदोरिया लेआउट भिवापूर रोड उमरेड हे आपल्या कामानिमीत्त बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडुन कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरी केली. अशा दोघाच्या वेगवेगळ्या तक्रारी वरून पोस्टेला अप. क. ४९५/२३ कलम ४५७, ३८० भादवी व अप. क्र. ४९९/२३ कलम ४५७, ३८० भादवी अन्वये अज्ञात आरोपीता विरुध्द वेगवेगळे दोन गुन्हे नोंद केले होते. सदर गुन्हयाचे तपासात पोलीसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरीता पथक तयार करून परिसरातील गुप्त बातमीदार तसेच टेक्नीकल साधानांचा वापर करून संशयीत आरोपी नामे भास्कर सतिश हेडावु वय २८ वर्ष रा. कोलीखाये लेआउट उमरेड यास ताब्यात घेवुन कसून चौकशी केली असता आरोपीताने दोन्ही गुन्हे केल्याचे कबुल केले व गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल १) ४३ इंच एलईडी टिव्ही किं. २०,०००/- रु. २) नगदी १३,११० /- रू. ३) इंडीयन गॅस सिलेंडर दोन नग किंमती ६०००/- रु. ४) स्टिलच्या दोन गॅस सेगडी दोन नग किं. ६०००/- रु. ५) पितळी गुंड एक नग किं. २०००/- रुव त्यामध्ये नगदी ५०००/-रुपये, ६) गुन्हयात वापरलेले वाहन होन्डा अॅक्टीव्हा क्रमांक MH 40AZ 7092 कि. ४०,०००/-रूपये, ७) घरफोडी करण्याकरीता वापरत असलेली एक लोखंडी ४४ इंचाची एका बाजुने टोकदार वाकलेली टॉमी किं. १००/- रु असा एकुण ९२२१० /- रुपयेचा माल जप्त केला आहे. आरोपीतास मा. विदयमान न्यायालयात हजर करून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि बटदुलाल पांडे हे करीत आहे..
सदरची कारवाई विशाल आनंद पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, संदिप पखाले, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण, राजा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरेड विभाग उमरेड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद पोंगे, प्रभारी दाणेदार पोस्टे उमरेड, पोउपनि बदुलाल पांडे, पोहवा प्रदिप चवरे, पोना राधेशाम कांबळे, पंकज बटटे, पोका रोशन सहारे यांनी केली आहे.