– 3 मोटरसायकल सह एकूण 68000 /- रुपये चा मुद्देमाल जप्त – तिरोडा पोलिसांची कार्रवाई
अमरदिप बडगे
गोंदिया – पोलीस स्टेशन तिरोडा हद्दीत मोटरसायकल चोरी जाण्याची घटना घडत होती. याला अंकुश लावण्याकरीता आणि घडलेले गुन्हे उघड करण्यासाठी प्रमोद मडामे, उप विभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे निर्देश नुसार योगेश पारधी, पोलीस निरीक्षक पो स्टे तिरोडा यांनी त्यांच्या मार्गदर्शन खाली विशेष पथकची स्थापना केली आहे. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील मोटर सायकल चोरी करणारे गुन्हेगार यांना तपासून त्यांची सर्वोतोपरीने सखोल तपासणी करणे, हदीत आकस्मिक नाकाबंदी करून मोटर सायकल चे कागदपत्रे तपासणी सुरु केली आहे.त्यानुसार गोंदिया शहर येथील DB पथक यांची मदत घेऊन त्यांच्या सोबत पेट्रोलिंग करीत असतांना त्यामध्ये नामे पारस भाकचंद चांदणी चौक गोंदिया येथे एक व्यक्ती विना नंबर ची मोटरसायकल चालविताना मिळून आला आहे . त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव भालेकर वय 34 वर्ष रा. लक्समिनगर, गौतम बुद्ध वॉर्ड, गोंदिया असे सांगितले आहे. त्याचे ताब्यातील मोटर सायकल चे कागदपत्रे विचारले असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तर देऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर संशय आल्याने अधिक विचारपूस केलेली असता. सखोल विचारपूस केली असतानी त्यानें तिरोडा हदीतील मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केलेले आहे . त्याचे कबुली वरून मोटर सायकल जप्त करण्यात आलेली आहेत.
(1) एक हिरो होंडा कंपनीची विना नंबर ची जुनी मोटर सायकल किं. 8000/- रुपये.
(2) एक हिरो फ्याशन कंपनीची मोटर सायकल क्रं. एम एच 35/वाय -093 किं 30000/- रुपये.
(3) एक बजाज पल्सर कंपनी ची जुनी मोटर सायकल क्रं एमपी 50/एम ए 0589 किं. 30000/-रुपये असा एकूण 68000 /- रुपये चा मुद्धेमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदर अरोपी कडून आणखी मोटर सायकल जप्त होण्याची शक्यात आहे.
सदरची कार्यवाही प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पो हवा सुरेश टेम्भरे, नापोशी विनोद लांडगे, नीलकंठ रकसे, पुंडलिक उके, चोपकर यांनी केलेली आहे.