घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगारास अटक, एकुण ०५ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. १२७, नूरी कॉलोनी, मस्जिद जवळ, जरीपटका, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे सोहेल असलम खान वय ३५ वर्षे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह सौदी अरेबीया येथे उमरा करीला गेले होते. दिनांक ०९.०८.२०२४ रोजी फिर्यादीचे मित्र त्यांने घरी गेले असता, पराचे कुलूप तुटलेले दिसल्याने, चोरी झाले याबाबत फिर्यादीस सुचना दिलेली होती. दिनांक २९.०८.२०२४ रोजी फिर्यादी हे घरी परत आले व पाहणी केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने घराचे दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून, फिर्यादीचे आईचे बेडरूम मधील व वहीणीचे बेडरूम मधील आलमारीतील रोख ४,००,०००/- रू. व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे ४,८५,०००/- रु. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन आरोपी क. १) संदीप खेमचंद टेंभरे, वय २४ वर्षे, रा. ग्राम डुंडा, बरघाट, जि. शिवनी, मध्य प्रदेश यास कन्हान येथील साई मंदीराचे परिसरातुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस अधिक विचारपूस केली असता, त्याने या गुन्हया व्यतीरिक्त पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील रामकृष्ण नगर तसेच मुतरोडी, टेमसना कामठी, तसेच हनुमान मंदीर जवळ वाठोडा असे ०३ ठिकाणी एकुण ०३ घरफोडीचे गुन्हे व पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील साई बाबा कॉलोनी दिघोरी येथे ०१ घरफोडीचा गुन्हा असे एकुण ०५ घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगीतले. आरोपी याने नमुद ०५ ही घरफोडीचे गुन्हयातील मुद्देमाल हा त्याचे ईतर साथिदार क. २) प्रफुल देवेन्द्र पटले वय २५ वर्ष रा. नागेश्वर नगर, विडगाव, पारडी, नागपूर ३) अजय मारोतराव भौरकर वय ४४ वर्ष रा. राणीभोसले नगर, भांडेप्लॉट, सक्करदरा, नागपूर ४) आकाश रमेश बोकडे वय ३२ वर्ष रा. कामठी रोड, कळमणा, नागपूर ५) राकेश मैटनीप्रसाद चतुर्वेदी रा. तेंदुआ केवलारी, जि. शिवनी मध्य प्रदेश ६) शेखर गायवाड रा. सोलापूर यांचे मदतीने विल्हेवाट लावल्याचे सांगीतले. आरोपी क. १ याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले वाहन, सोन्याची लगड व सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण किंमती अंदाजे १२,७९,५००/-रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता, आरोपी क. १ याचेवर अनेक घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असुन, तो रेकॉर्डवरील अ‌ट्टल गुन्हेगार आहे. आरोपी क. १ व २ यांना अटक करून मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव जरीपटका पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. अटक आरोपींना मा. न्यायालया समोर हजर करून त्यांची दिनांक २३.०९.२०२४ पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. आरोपी क. ३ ते ६ यांचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. ३ चे पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि. मधुकर काठोके, सफौ दशरथ मिश्रा, पोहवा, विजय श्रीवास, संतोषसिंह ठाकुर, पोअं. जितेश रेड्डी, दिपक दासरवार, दिपक लाकडे, विशाल रोकडे व प्रमोद देशभ्रतार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गांजा बाळगणाऱ्या आरोपींना अटक

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- कळमणा पोलीसांचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, पाळत ठेवुन पोलीस ठाणे हद्दीत चिखली चौक ते कळमणा स्टेशन कडे जाणारा मालधक्का कच्चा रोड येथून अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ ए. वाय ५२४६ ने काळया रंगाचे बॅगसह जाणारे आरोपी १) मोहम्मद सरफराज वल्द मोहम्मद अब्दुल सत्तार, वय ३८ वर्षे, टिपू सुलतान चौक,यशोधरानगर, नागपूर २) डोलामणी बुडू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com