जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक

मौदा :-  पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. मौदा हद्दीत स्टाफसह अवैध गोवंश वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा कडुन नागपूर च्या दिशेने NH-53 महामार्गाने ट्रक क्र. MH-31/DS-7786 तसेच महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-49/AT-6054 मधून अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने नमूद दोन्ही वाहनांना नाकाबंदी करून मौजा मारोडी शिवारात पकडून पाहणी केली असता ट्रक क्र. MH-31/DS-7786 मध्ये २० गोवंशिय जनावरे तसेच महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-49/AT 6054 मध्ये ६ गोवंशिय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून, आखूड दोरखंडाने बांधुन व जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तली करिता घेऊन जातांना मिळून आल्याने ट्रक चालक नामे सय्यद फारुख वल्द सय्यद रशीद वय ३३ वर्ष रा. भाजीमंडी, कामठी, क्लीनर जमील कदीर खान वय २५ वर्ष व मजूर रेहान इक्बाल कुरेशी, वय ३० वर्ष दोन्ही रा. टेकानाका, नागपूर त्याचप्रमाणे बोलेरो पिकअप चा चालक प्रकाश महादेव बोरकर वय ३६ वर्ष व मयूर नत्थूजी देशमुख वय २१ वर्ष दोन्ही रा. खराडा पुनर्वसन ता. मौदा यांना ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून एकूण २६ गोवशिय जनावरे किंमती ५,२०,०००/- रू, ट्रक क्र. MH-31DS- 7786 की २५,००,०००/- रू. महेंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-49/AT-6054 . ८,००,०००/- रु. तसेच आरोपीतांचे चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन किंमती ९०,०००/- रू. असा एकूण ३९,१०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर वाहना मधील गोवंशिय जनावरांना योग्य व्यवस्थापनार्थ गोरक्षण केंद्र भंडारा येथे दाखल करण्यात आलेले आहे. गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करण्यात आली असून त्यांचे विरुद्ध कलम ११(१) (d) (f) (e) प्रा. छळ प्रति. अधि. १९६० सहकलम ५ अ (१),९ महा. प्रा. सं. अधि. १९७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग, ठाणेदार पो.नि. सतीशसिंह राजपूत, पो. उपनी महेश बोथले पो. हवा. संदीप कडू, पो. हवा. गणेश मुदमाळी, पो. हवा. रुपेश मुदमाळी, पो.ना. दिपक दरोडे, पो.अ. अतिश गाढवे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मौजा गोंडखैरी येथील पारधी बेडयावरील गावठी हातभ‌ट्टीच्या दारूची निर्मीती करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई

Tue Jun 11 , 2024
नागपूर :-दिनांक ०७/०६/२०२४ से १६.३७ वा. दरम्यान अनिल म्हस्के सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांना मुखबिरव्दारे मिळालेल्या माहिती वरून मौजा गोंडखैरी मोठया प्रमाणात गावठी हात भ‌ट्टीचे दारूची निर्मीती करण्यात येत आहे अशा माहितीवरून अनिल महस्के सहा. पोलीस अधिक्षक यांनी सोबत स्था.गु.शा. नागपूर ग्रामिण, पोलीस स्टेशन सावनेर, केळवद, खापा नागपूर गामिण येथील आर.सी.पी पथक यांचे एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com