जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक

– जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

नागपूर :- पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत दिनांक २९/०७/२०२३ चे दुपारी १३.३५ वा. दरम्यान जिल्हा वाहतुक शाखेचे पथक मोठा टोल नाक्याजवळ वाहतुक केसेस करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली की बोलेरो पिकअप क्रमांक MH-36 / AA-2544 मध्ये अवैध्यरित्या जनावरांची वाहतूक करीत भंडारा कडुन चाफेगडी कडे येत आहे. अशा खबरेवरून मौजा माथनी ते चाफेगडी रोडवर स्टॉफच्या मदतीने नाकाबंदी करीत असतांना १४.३० वा. दरम्यान माथनीचे दिशेने एक बोलेरो पिकअप वाहन येतांनी दिसल्यावरून त्या बोलेरो पिकअप गाडीला हात दाखवुन थांबण्याचा ईशारा केला असता सदर बोलेरो पिकअप चालक आरोपी नामे- १) आतिश किशोर बन्सोड, वय २३ वर्ष, रा. लावेश्वर ता. भंडारा जि. भंडारा २) अमन सुरेश मते, वय २० वर्ष, रा. टोवेपार ता. भंडारा जि. भंडारा हे पोलीसांना ड्रेसवर पाहून वाहन तिथेच थांबवुन पळु लागले. त्याचा स्टाफच्या सहाय्याने पाठलाग करून त्यास पकडले व त्यास वाहनामध्ये काय आहे तु का पळतो असे विचारणा केली असता तो उडवा उडवीचे उत्तर देऊ लागला व वाहनाची तपासणी केली असता वाहनांच्या डाल्यामध्ये एकुण ०७ गोवंश जनावरे त्याची पाय व मुसके बांधुन त्यांना कुठल्याही प्रकारे हालचाल करता येणार नाही अशा प्रकारे एकावर एक रचुन प्राण्यांना वेदना होईल अशा प्रकारे अत्यंत क्रूरतेची वागणुक देत कत्तलीकरीता वाहुन नेतांना आढळून आल्याने मोक्यावरून ०७ गोवंश बैल एकुण किमती १,०५,०००/- व बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH-36 /AA-2544 किंमती ६,५०,०००/- असा एकूण ७,५५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून प्राण्यांच्या संरक्षण कामी त्यांना गोशाला येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने दाखल करण्यात आले असून सदर बोलेरो पिकअप पोलीस स्टेशन मौदा येथे दाखल करण्यात आले आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोलीस हवालदार रविन्द्र रुपचंद बर्वे, जिल्हा वाहतुक शाखा ना. ग्रा. यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे वरील आरोपीताविरुध्द कलम ५ ५(अ) ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६, सहकलम ३४ भादवी काद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस स्टेशन मौदा करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक श्री. डॉ. संदिप पखाले, पोलीस उप अधिक (गृह) विजय माहुलकर यांचे मार्गदर्शनात चालक सहायक फौजदार सुधीर यादव, पोलीस हवालदार रविंद्र बर्वे, पोलीस नायक प्रणय बनाफर, पोलीस अंमलदार मनिए चव्हान, कार्तिक पुरी यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना अटक

Wed Aug 2 , 2023
काटोल :- अंतर्गत खापरी (केने) एरंडा रोड ता. काटोल येथील फिर्यादी नामे- मुकेश बळीराम चव्हान, वय २५ वर्ष, रा. खापरी केने ता. काटोल याला दि. ३१/०७/२०२३ रोजी सायंकाळी १७/३० वा. चे दरम्यान त्यांचे भाऊ नामे- धिरज चव्हाण याने फोन करून सांगीतले की मौजा एरंडा खापरी शिवारातील शेतात जयदेव जगदिश चंद्रावत व त्याचा भाऊ सागर जगदिश चंद्रावत यांनी पकडुन ठेवले व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com