दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या ५ आरोपींना अटक, २६,१६० /- रु. चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ चे ०१.४५ वा. ते ०३.१० वा. चे दरम्यान गुन्हेशाखा युनिट क्र. ४ पोलीसाचे पथक हे पेट्रोलीग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून त्यांनी पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत गोवर्धन नगरी ९-१० जवळील मोकळया जागेत शिवनकर चौक येथे रेड कारवाई केली असता, त्या ठिकाणी आरोपी क. १) मयूर गजानन जाधव, वय २५ वर्षे २) रोहीत महादेव गिरी, वय २२ वर्षे, ३) रितीक विजय शेंदरे, वय २१ वर्षे तिन्ही रा. साईबाबा नगर, संतोषी किराणाजवळ खरबी, नागपुर, ४) गौरव शेखर उरकुडे, वय २० वर्षे पल. नं. ९६. आवण नगर, वाठोडा ५) नुर मोहम्मद फिरोज खान, वय १९ वर्षे राह शिवणकर नगर झोपडपट्टी, नंदनवन, हे आपले ताब्यात प्राणघातक शस्त्र घेवुन दरोडा टाकण्याचे तयारीत असतांना समक्ष मिळुन आले. आरोपींना घेराव टाकुन ताब्यात घेतले. त्यांचे जवळून एक लोखंडी तलवार, हल्लीमार चाकु, चायना मेड चाकु, स्टील रोड, मिर्ची पावडर, दोरी, २ मोबाईल फोन, असा एकूण किमती अंदाजे २६.१६०/- रु चा मुद्देमाल मिळून आला. आरोपी क. ०४ गौरव उरकुडे हा मा. पोप परिमंडळ क्र. ०४ यांचे आदेशान्वये १ वर्षाकरीता नागपुर शहरातून हद्दपार असतांना विना परवाना मिळून आला. आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि विनोद यदि यांनी कलम ३९९, ४०२ भावी सहकलम ४/२५ मा.हंका, सहकलम १३५ १४२ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगीरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे  मार्गदर्शनाखाली वपनि सोनटक्के, पोउपनि अविनाश जायभाये, पोहवा सुनिल ठक्कर, नागोअ दिपक बोले, देवेंद्र नवघरे,अतुल चाटे, चेतन पाटील व स्वपनिल अमृतकर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानिशी ठार मारणाऱ्या पाहीजे आरोपींना अटक

Tue Aug 22 , 2023
नागपूर :- दिनांक १६.०८,२०२३ चे २१.०० वा. ते २१.३० वा. चे दरम्यान फिर्यादी रवि बच्चन जैस्वाल वय २५ वर्ष ग. वार्ड नं. ०३, उमरेच्या दवाखान्याजवळ, हिंगणा रोड, राजीव नगर, नागपुर व राकेश चंद्रकांत मिश्रा वय ३२ वर्ष ग.राजीव नगर, हे पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हट्टीत, राजकुमार जैसवार याचे राम पान पॅलेस राजीव नगर, येथे बसुन होते. राकेश मिश्रा याचे आरोपीचे वडीलासोबत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!