मनपाद्वारे गांधीबाग उद्यानात गणगौर विसर्जनाची व्यवस्था

नागपूर :- होळीपासून प्रारंभ झालेल्या गणगौर पूजेचे शुक्रवारी २४ मार्च रोजी विसर्जन असून नागपूर महानगरपालिकेतर्फे गांधीबाग उद्यानामध्ये गणगौर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार गांधीबाग उद्यानामध्ये कृत्रिम विसर्जन कुंडांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

होळीपासून गणगौर पूजनाला प्रारंभ झाला. १८ दिवस चाललेल्या पूजनाचे उद्या शुक्रवारी विसर्जन करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे गांधीसागर तलावामध्ये गणगौर विसर्जनाची व्यवस्था करून दिली जात असे. मात्र मागील वर्षीपासून गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे कार्य सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षी मनपाद्वारे गांधीबाग उद्यानामध्ये गणगौर विसर्जनाची सोय करण्यात आलेली होती. यावर्षीही तलावाचे सौंदर्यीकरण कार्य सुरू असल्यामुळे गांधीबाग उद्यानामध्येच गणगौर विसर्जन करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कर्तृत्ववान माणसालाही लाजवेल इतके महान कार्य कर्तृत्वान महिला ऍड. सुलेखा कुंभारेंचे - प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे

Fri Mar 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या जीवनावर आधारीत ‘कर्मवीर’स्मरणिकेचे प्रकाशन कामठी :- कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक लढ्यातील अत्यंत निष्ठावंत ,निर्भीड ,निश्चयी ,नि:स्पृह व थोर संघर्षशील लोकनेते म्हणून ख्यातिप्राप्त असून ‘बिडी मजदूर चळवळ’व ‘आंबेडकरी चळवळ’ या दोन्ही आंदोलनातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वस्वी त्याग करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com