कान्होबा विसर्जनाकरीता मनपाकडून कृत्रिम टँकची व्यवस्था

नागपूर :- श्री. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घराघरात बुधवारी श्रीकृष्णाची स्थापना झाली असून, या कान्होबाचे गुरुवारला विधिवत विसर्जन करण्यात आले. कान्होबा विसर्जनाकारिता नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील विविध तलाव परिसरात कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली. या कृत्रिम टँकचा लाभ घेत भाविकांनी आपल्या घरातील श्रीकृष्ण मूर्तींचे विसर्जन केले.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय श्रीकृष्ण मूर्ती विसर्जनाकरिता कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली. तसेच निर्माल्य कुंडीची देखील व्यवस्था करण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सोनेगाव तलाव, नाईक तलाव, सक्करदरा तलाव परिसरासह अन्य भागात विसर्जन टॅंकची व्यवस्था करण्यात आली याशिवाय लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या नागपूरे शाळे जवळ कळमना भरतवाडा रोड, सतनामी नगर चौक दुर्गा माता मंदिर समोर, छाप्रू नगर हनुमान मंदिर गरोबा मैदान, अन्नापुर्णा मंदिर, कुंभार टोळी चौक तसेच गांधीबाग झोन अंतर्गत चिटणीसपार्क गेट जवळ, महाल, म.न.पा. झोन कार्यालय महाल, गांधीबाग बगीचा गेट जवळ, चंद्रहास बियरबार जवळ, सि.ए. रोड, कापसी चौक, धावडे मोहल्ला, तसेच सतरंजीपुरा झोन अंतर्गत गीरमा सावजी जवळ, नाईक तलाव, महात्मा ज्योतीबा फुले शाळेजवळ, धावडे मोहल्ला,चकोले दवाखान्या जवळ आदी विविध परिसरात कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री राधा कृष्ण मंदिर में हुआ कान्हा का अभिषेक

Fri Sep 8 , 2023
– आज होगा नंदोत्सव             नागपुर :- वर्धमान नगर के श्री राधा कृष्ण मंदिर में कान्हा के जन्मोत्सव धूमधाम से मनाया गया। जन्माष्टमी पर यहाँ भक्तों का तांता लगा रहा। पूरा मंदिर परिसर फूलों व लाइटिंग से सजाया गया| राधाकृष्ण के श्रीविग्रहों का दूध, दही, पंचामृत, शहद, घी, शक्कर से अभिषेक किया गया। पूजन पोद्दार परिवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com