कोदामेंढी :- अरोली – कोदामेंढी जि प सर्कल परिसरात आज दिनांक 13 नोव्हेंबर बुधवारला पहाटेपासूनच गुलाबी थंडीचे आगमन झाल्याचे , सकाळी या परिसरात वृत्तपत्र वाटणारे विविध हिंदी व मराठी दैनिक वृत्तपत्राचे व जाहिरात एजंट रमेश हटवार यांनी सांगितले. लहान मुलेही घराबाहेर पडताना स्वेटर व कानाला मफलर घालून घराबाहेर पडताना दिसले .तर वृद्धही स्वेटर व मफलर घालून सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडत आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र पाऊस न झाल्याने व ढगाळ वातावरण नाहीसे होऊन गुलाबी थंडीचे आज पहाटेपासून आगमन झाल्याने धान पिकाचे होणारे नुकसान वाचले असून, रब्बी पिकांना त्याच्या फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमधील काहीशी चिंता दूर झाल्याचे काही शेतकऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ढगाळ वातावरण नाहीसे झाल्याने मजुरांमार्फत व मशीन मार्फत धान कापणीला वेग आलेला आहे.
अरोली -कोदामेंढी जि प सर्कल परिसरात आज सकाळपासून गुलाबी थंडीचे आगमन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com