लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या हस्ते मिल्खा सिंह स्टेडीयममध्ये दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण

पुणे :- आपल्या देशाच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या अनेक महिनांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेल्या “वंदे माँ भारती” या लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्ट. जनरल अजय सिंह यांच्या हस्ते 5 मे 24 रोजी झाले.

प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग हे या गीताचे मूळ गायक आहेत. ब्रिगेडियर बिक्रमजीत सिंग, सुभाष सहगल आणि करण मस्ताना यांच्या या पदरचनेला मंत्रमुग्ध करणारे संगीत संयोजन रणजीत बारोट यांचे आहे. तर या गीताचे व्हिडिओ संपादन अतुल चौहान, अवध नारायण सिंह, ब्रिगेडियर बिक्रमजीत, सुभाष सहगल आणि लेफ्टनंट कर्नल संदीप लेघा यांनी केले आहे.

प्रत्येक स्वर आणि भाव अतिशय उत्कटतेने आणि सर्जनशीलतेने मांडणारे हे गीत म्हणजे दक्षिण कमांडच्या सामूहिक मुल्ये आणि उत्कृष्टतेच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे. परिश्रमपूर्वक संशोधन आणि सातत्यपूर्ण अभिजातता राखत, संगीतकारांनी ऐतिहासिक भान जागवत सुरांनी ओतप्रोत अशा निनादणाऱ्या स्वरलयी गुंफल्या आहेत ज्या सर्व स्तरावर आणि कुटुंबांमध्ये वैश्विक भावना जागृत करतात.

या गीताचे अनावरण हा केवळ दक्षिण कमांडच्या गौरवशाली भूतकाळाचा सोहोळा नव्हता, तर कमांडचा वारसा पुढच्या पिढी साठी ठेवताना कमांडच्या उत्कटतेची, एकतेची आणि चिरकालीन दृष्टिकोनाची ही प्रचिती आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बोअरवेल - विहीरधारकांची तपासणी सुरु, रेन वॉटर हार्वेस्टींग केले नसल्यास होणार दंड

Mon May 6 , 2024
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत ज्या मालमत्ताधारकांच्या घरी बोअरवेल अथवा विहीर आहे मात्र त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टींग केलेले नाही अश्या मालमत्ताधारकांची प्रत्यक्ष तपासणी मनपातर्फे सुरु करण्यात आली असुन रेन वॉटर हार्वेस्टींग केले नसल्याचे आढळल्यास २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. शहरातील सर्व बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे, अश्या मालमत्ताधारकांना प्रसार माध्यमे,दूरध्वनी, एसएमएस, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!