सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

भंडारा :  माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी 7 डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्ह्याचा ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ दिप प्रज्वलन व शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिषद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. बारस्कर, वीरपत्नी व माजी सैनिक याप्रसंगी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कदम म्हणाले, जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच अवलंबीत यांची कोणत्याही कार्यालयाकडे प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडे एकत्रित करुन आमच्या पर्यंत पोहचवावेत जेणे करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच सशस्त्र सेना ध्वज निधी 2021 संकलनाचे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट 35 लक्ष 45 हजार सहज पूर्ण करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्ह्याला ध्वजदिन निधी 2020 करिता दिलेला इष्टांक 28 लक्ष 45 हजार वेळेच्या आत पूर्ण करुन एकूण संकलन 33 लक्ष 48 हजार साध्य केले, असे त्यांनी प्रास्ताविकेतून सांगितले. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी तसेच इतर कार्यालय प्रमुखांचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमात वीरपत्नी, माजी सैनिक पाल्य यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक पाल्य नितलेश बानासुरे यांची इंडियन आर्मी मध्ये अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यामुळे शाल, श्रीफळ व धनादेश देवून जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा सैनिक कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक सुधाकर लुटे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

प्रियरंजन कुमार को Snapdeal ने वाइस प्रेसिडेंट और बिजनेस हेड नियुक्त

Thu Dec 9 , 2021
मुंबईर: भारत के प्रमुख मूल्य ई-कॉमर्स प्लेटफॉर्म, Snapdeal ने आज प्रियरंजन कुमार को उपाध्यक्ष और बिजनेस हेड के रूप में नियुक्त करने की घोषणा की। खुदरा उद्योग में एक अनुभवी नेता, वह कंपनी के विभिन्न विकास और विस्तार की पहल का नेतृत्व करेंगे। Snapdeal में शामिल होने से पहले, प्रियरंजन Iconic Fashion के मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) थे, जहां उन्होंने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com