संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर महामार्गावरील एका नामवन्त बिअर बार मध्ये समोरील टेबल वर बसलेला एक इसम हा आपल्या मित्रांसोबत बसला असता अचानक त्याला फोन आला व तो मोबाईल वर जोराने बोलू लागला यावर आरोपीने जोराने बोलण्यास मज्जाव केल्याने दोघात झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन हाणामारीत झाला व आरोपीने त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर काचेचा ग्लास मारून जख्मि केल्याची घटना काल रात्री साडे दहा दरम्यान घडली असून या घटनेत मनोज दीपक वालदे वय 25 वर्षे गंभीर जख्मि झाले असून यासंदर्भात जख्मि मनोज वालदे ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राकेश गेडेकर,महेश पाटील रा वारेगाव कामठी विरुद्ध भादवी कलम 109,351(3),352,3(5),बीएन्स अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.