कामठी तालुक्यात राशन दुकानदारांचा मनमानी कारभार..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-राशन दुकानदारा विरोधात जागरूक नागरिकांचा एल्गार,तहसीलदार कडे केली तक्रार

कामठी ता प्र 23 :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील राशन दुकानदाराकडून शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिक मशीन पद्धतीचा वापर करून धान्य वितरित करण्यात येते मात्र लाभार्थी शिधापत्रिका धारकाने किती धान्य उचलले याची पूर्ववत पद्धतीने पावती देत नसून लाभार्थ्यांचा हक्काचा धान्य रेशन दुकानदार गिळंकृत करीत असल्याचा प्रकार बहुतेक रेशन दुकानात घडत असून या प्रकाराला चाप बसावा व अश्या भ्रष्ट रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करून संबंधित दोषी रेशन दुकांनदारावर कायद्याचा बडगा वाजवत गुन्हे दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कामठी शहरातील रमानगरच्या जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत भ्रष्ट रेशन दुकानदाराविरोधात एल्गार पुकारत कामठी तहसीलदार ला सामूहिक निवेदन देण्यात आले.

कामठी नगर परिषद हद्दीतील रेशन पुरवठा धारक आनंद आगुटलेवार, शशिकांत जैस्वाल, शरद महल्ले यासारखे इतर सर्व रेशन दुकानदार हे लाभार्थी शिधापत्रिका धारकांना नियमित धान्य वाटप करीत नसून धान्य आले नसल्याच्या नावाखाली बळ दोन दोन महिन्यांचे राशन देत नाही.आलेला धान्यसाठा फलकावर व नोंदवहीत दाखवत नाही, धान्याचे रेटबोर्ड जाहीर करीत नाही .राशन दुकान नियमित चालू ठेवत नाही, राशन दुकान परवाना दुकानात ठेवला जात नाही,धान्याचे नमुने ठेवले जात नाही,विक्री रजिस्टर न ठेवणे,कार्डधारकांना शिधापत्रिकेवर दर्शविलेला धान्य मिळत नाही, धान्य उचल केल्याची पावती मिळत नाही, पुस्तकी शिल्लक व प्रत्यक्ष साठा यात मोठी तफावत आहे.वेगवेगळ्या प्रकारचे हिशोब वही न ठेवणे, महाराष्ट्र फुडग्रेन रेशनिंग अँड 1966 व महाराष्ट्र अनुसूचित वास्तुब (वितरण विनिमय) आदेश 1975 अनव्ये विहित केलेली वेगवेगळी रजिस्टर ठेवत नाहीं.अधिकृत वजन मापे न करणे अशा अनेक बाबीवर नागरिकांनी आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांनी कामठी तालुक्यातील रेशन दुकानदारांची तपासणी करून दोषी रेशन दुकानंदारांचा परवाना रद्द करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी रमानगरचे जागरूक नागरिकगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

तालुका व गाव दक्षता समित्या अस्तित्वात नाही

—गोरगरीब जनतेला त्याच्या हक्काचे राशन मिळावे म्हणून रेशन दुकांनदारावर देखरेख राहावी म्हणुन तालुका व गाव दक्षता समिती कार्यान्वित असते या समितीच्या माध्यमातून शिधापत्रिका व एकांकाची संख्या आणि जीवनावश्यक वस्तू परिणाम या आधारे वस्तूंची गरज व प्रत्यक्ष उचल याचा तपशील तपासून आढावा घेणे .रेशन दुकानात झालेली वस्तूची आवक दक्षता समितीच्या किमान दोन सदस्यांनी प्रमाणित करणे, वस्तूंचा पुरवठा आवश्यक नियतन व प्रत्यक्ष झालेली आवक आणि उचल व साठ्याच्या त्रुटींचा आढावा घेणे .शिधापत्रिका धारकांना पुरविल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची प्रत तपासणे, रेशन दुकानदार यांच्या गैरव्यवहार विरुद्ध सुसूत्रता आणण्याबाबत दुकान तपासणी करणे आदी कार्य दक्षता समिती मार्फत केल्या जातात परंतु दक्षता समित्याच अस्तित्वात नसल्याने राशन दुकानदारांचे चांगलेच फावत आहे त्यामुळे या रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करून तात्काळ दुकानदाराच्या मनमानी कारभारावर ब्रेक लावावा अशी अपेक्षा तालुक्यातील जागरूक नागरिकांसह रेशनकार्ड धारकांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवघ्या चोवीस तासात चोरट्याचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त..

Fri Sep 23 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकातील जितीन जैस्वाल यांच्या किराणा दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील गल्ल्यातील चिल्लर,रोख रक्कम तसेच दुकानाच्या वरच्या मजल्यावरील घरातील पूजा खोलीतील आलमारी मधून पूजेचे तीन चांदीचे सिक्के, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक 3 ग्रामची सोन्याचे मनी असलेली पोथ, लोखंडी टामी असा एकूण 49 हजार 990 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!