मुंबई :- महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम , २०१२ अंतर्गत नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांचे दर्जावाढ करण्यासाठी २४१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
या प्रस्तावाची छाननी करून पात्र झालेल्या शाळांची यादी www.mahasfs.org/ www.education.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे मुबंईचे क्षेत्र स्तरीय प्राधिकरण तथा विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
काही हरकती व सूचना असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई कार्यालयास कळविण्यात यावे, असेही प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आली आहे.