– आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश ; हजारो नागरिकांना मिळाला दिलासा .
वरूड :- वरूड तालुक्यातील वाठोडा येथे सद्यस्थितीत आरोग्य केंद्र नसल्याने येथील रूग्णांना उपचारासाठी वरूड येथे जावे लागत होते. यात प्रामुख्याने गरोदर महीला, अतिदक्षतेचे रूग्ण यांची उपचारासाठी मोठी गैरसोय होत होती. वाठोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे व केंद्राचा माध्यमाने वाठोडा गावासह सभोवतालील गावांना जवळच उपचार घेता यावे यासाठी आमदार देवेंद्र भुयार, माजी पंचायत समिती सभापती निलेश मगर्दे हे प्रयत्नशिल होते. यांच्या प्रयत्नांचे फलीत म्हणून वाठोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.
अखेर आमदार देवेंद्र भुयार यांची ती मागणी पूर्ण झाली असून आमदार देवेंद्र भुयार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने वाठोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. वाठोडा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत यामुळे परिसरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने वाठोडा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला २७ जुन रोजी शासन निर्णय काढून मंजुरी दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आभार मानले.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र खूप मोलाची भूमिका बजावत असतात. खेड्यापाड्यात राहणार्या सर्वसामान्य जनतेला शहरातील मोठ्या खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार घेणे परवडत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्याच भागात माफक आणि विनामूल्य उपचार मिळावेत, कोणीही गरजू रुग्ण उपचारा अभावी राहू नये, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे. आमदार देवेंद्र भुयार हे आरोग्यासेवेवर सर्वात जास्त भर देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत याकडे काजळीपूर्वक लक्ष देत आहेत. याकरिता त्यांनी संपूर्ण मोर्शी विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर निर्माण करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून मतदार संघातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचे काम आमदार देवेंद्र भुयार यांनी केले असून त्यांनी रुग्ण सेवेच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णलयात मोफत उपचार करून हे रुग्णसेवेचे काम सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले असून मतदार संघातील जनतेने आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.