नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता

– विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई :- नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरीता अमृत टप्पा दोन मधून मलनिस्स:रणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एनएमआरडीए आयुक्त मनोज सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील दक्षिण ब आणि पूर्व अ या भागातील सुमारे २५ गावांमधील मलनिस्सारणाकरिता ५०० किमी लांबीची मलनिस्सारण वाहिनी अमृत टप्पा २ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये चार मलनिस्सारण प्रकल्प आणि एक पंप हाऊस यांचा समावेश आहे.

आज झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या १८८६.९१ कोटीच्या अंदाजपत्रकात कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा तीर्थक्षेत्र विकास टप्पा ३, दीक्षाभूमी विकास, कर्करोग रुग्णालय, हिंगणा क्षेत्रातील मुलभूत सुविधा, पूर मदत निधी, रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजना, श्री क्षेत्र धापेवाडा येथे मलनिस्सारण केंद्राचे बांधकाम, पर्यटन विकास यासारख्या विकास कामांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय भूमिजल बोर्ड (CGWB) नागपुर द्वारा, नागपुर में भूजल संबंधित तीन दिवसीय टियर-II प्रशिक्षण कार्यक्रम का आयोजन

Thu Feb 15 , 2024
नागपूर :- भारत सरकार,जलशक्तिमंत्रालय, जल संसाधन, नदीविकास एवं गंगा संरक्षण विभाग के अधीनस्थ कार्यालय, केंद्रीय भूमिजल बोर्ड,मध्य क्षेत्र, नागपुर द्वारा राजीव गांधी राष्ट्रीय भूजल प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थान के तत्वाधान दिनांक 14 से 16 फरवरी 2024 तक प्रोफेसर एल. जी. ग्वालानी सभागृह, भूविज्ञान विभाग,राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर में “क्षेत्रीय भूजल मुद्दे आणि प्रबंधन”इस विषय पर तीन दिवसीय टियर-IIप्रशिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com