नवनियुक्त १२ पोलीस पाटील यांचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस पाटील यांची मासिक बैठक घेऊन पोलिस स्टेशन परिसरात आगामी पोळा सण व गणेशोत्सवाचे नियोजन व मार्ग दर्शन करून नवनियुक्त बारा पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

सोमवार ( दि.११) ला पोलीस स्टेशन कन्हान येथे आगामी सण पोळा, गणेशोत्सवाचे नियोजन व मार्गदर्शनाकरिता बैठक आणि पोलीस पाटील यांची मासिक सभा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दिपक पालिवाल यांच्या अध्यक्षेत घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी नागपुर जिल्हाध्यक्ष मारोती ठाकरे, रामटेक तालुकाध्यक्ष दिलीप भांडारकर, पोलीस निरिक्षक सार्थक नेहते प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी आगामी सण पोळा, गणेशोत्सवाचे नियोजना विषयी मार्गदर्शन करून कन्हान पोस्टे अंतर्गत नवनियुक्त पोलीस पाटील १) सोनु सुमेल गेडाम खोपडी, २) योगेश श्रीराम नांदुरकर बोरडा (गणेशी), ३) आकाश सदाशिव वैद्य गहुहिवरा, ४) चक्रधर देविदास वासनिक खेडी, ५) नरेंन्द्र रामदास राऊत येसबा (सालवा), ६) कैलास नत्थुजी कारेमोरे सालवा, ७) संदीप मोतीराम भोले नरसाळा, ८) कुणाल बाळु ब्राम्हणे केरडी, ९) विकास एकनाथ हटवार खंडाळा (घटाटे), १०) राहुल रामप्रसाद कालबेले घाटरोहणा, ११) प्रदिप बापुराव उके जुनीकामठी, १२) सुभाष देवचंंद बल्लारे डुमरी (खुर्द) या बारा पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील बोरी (सिंगारदिप) अजय ईखार यानी तर आभार खुपिया शालिकराम महाजन यांनी व्यकत केले. यावेळी लोभेश्वर गड़े पोलीस पाटील तेलंखेड़ी, श्रीकृष्णा कुथे हिवरा (गागनेर), गुंडेराव चकोले निलज, संदिप नेऊल बोरी (रानी), संतोष ठाकरे नांदगाव, दुर्योधन ठाकरे गहुहिव रा, पुरुषोत्ताम दोडके सिंगारदिप, शालु हेमराज घरडे येंसबा, आशा नारनवरे, ईश्वर राऊत गांगनेर, रामाजी काकडे वाघोली, संजय नेवारे वराडा, अरविंद गजभिये आदी पोलीस पाटील उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस असल्याचे सांगुन सोन्याच्या अंगठया चोरून दोन जेष्ठ नागरिकांची फसवणुक

Wed Sep 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या स्थळी अज्ञात दोन इसम दुचाकीने येऊन पोलीस असल्याचे खोटे सांगुन दोन वयोवृध्द जेष्ठ नागरिकाना त्याच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढुन खिश्यात ठेवण्याचे सांगुन ते घेऊन हातसपाई करित कागदात दगड गुडाळुन त्याच्या पिशवीत व खिश्यात ठेवुन पसार होऊन दोन जेष्ठ नागरिकांच्या सोन्याच्या दोन अंगठया किमत २७ हजार रूपयाने चोरून फस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com