भंडारा :- ओबीसी च्या न्याय हक्का साठी लढ्याला नव्या जोमाने लागण्यासाठी ओबीसींचे प्रश्न शासन दरबारी माडण्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या ओबीसी सेल च्या जिल्हाध्यक्ष पदी इजि.संजय नासरे यांची नागपूर येथील ओबीसी सेलच्या विदर्भ स्थारिय आठवा बेठकी मध्ये प्रदेशाध्यक्ष राज रायपूरकर व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
इजि.संजय नासरे यांची नियुक्ती ही पक्ष संघटना वाढीस तसेच ओबीसी यांचे जाती जनजागृतीसाठी, ओबीसी चे हक्का साठी लढा देण्यासाठी देखील जनतेत जाऊन जनजागृती करण्याचे निर्देश माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांनी जिल्हाध्यक्ष यांना मार्गदर्शन केले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नियुक्ती करतेवेळीस जिल्हाध्यक्ष किरण अतकरी प्रदेशाध्यक्ष राज रायपूरकर, भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, भंडारा तालुकाध्यक्ष ईश्वर कडंबे,ओबीसी शहराध्यक्ष बबन बुधे, माधव नारनवरे,व इतर पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.