संदीप कांबळे, गजेंद्र डोंगरे यांची नियुक्ती

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नागपूर जिल्हा निमंत्रक पदी कामठी येथील देशोन्नतीचे पत्रकार संदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक म्हणून बाजारगाव येथील नवभारतचे पत्रकार गजेंद्र चंपतराव डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्तया असतील.दोघांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन तेथे पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या स्थापन करावयाच्या आहेत..

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी डोंगरे आणि कांबळे यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्ह्यात महिला मतदान जनजागृती

Sat Mar 9 , 2024
– विविध क्षेत्रातील महिलांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे :- आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्ह्यात महिला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्ग तसेच नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये तहसील कार्यालय येथे महिलांचा सन्मान करण्यात आला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!