संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- बेटा-बेटी बचाओ, नशा हटाव राष्ट्रीय अभियान अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश मुख्य संयोजक चंद्रपाल चौकसे हयानी प्रशांत मसार यांची पारशिवनी तालुका मुख्य संघटक प्रतिनिधी पद्दी नियुक्ती करण्यात आली आहे.
रामटेक विधानसभा क्षेत्रात बेटा-बेटी बचाओ, नशा हटाव राष्ट्रीय अभियान राबविण्यात येत असुन अभियानचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संयोजक व अध्यक्ष चंद्रपाल चौकसे हयानी बेटा-बेटी बचाओ, नशा हटाओ राष्ट्रीय अभियान रामटेक विधान सभा क्षेत्रातील कन्हान, पारशिवनी, दहेगाव, नवेगाव सह तालु क्यात यशस्विरित्या अभियान राबवुन जनसामान्य नागरिकांत जनजागृती करून युवा पिढीला नसे पासुन मुक्त करित आदर्श बनविण्याकरिता बेटा-बेटी बचाओ, नशा हटाव राष्ट्रीय अभियान पारशिवनी तालुका मुख्य संघटक प्रतिनिधी पद्दी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी पत्रकार चंद्रकुमार चोकसे, किशोर वासाडे तसेच पिंपरी गावातील नीलकंठ कुरडकर, केसरीचंद खंगारे, देवा चतुर, अशोक मेश्राम, सूरज महातो, रवी मेश्राम, मोरेश्वर भोयर, नींबा केवट, पवन समुंद्रे, तुषार येलमुले, जानुबाई बर्वे, राधाबाई भोयर, प्रभा उईके, लक्ष्मी कुडे, कडणायके, श्रुती येलेकार, सविता खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.