राष्ट्रीय सरपंच संघाच्या नागपूर जिल्हध्यक्षपदी लक्ष्मण करारे यांची नियुक्ती 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– जिल्ह्यातील सरपंचांना एकत्र आणण्याचा निर्धार 

कामठी :- देशातील सरपंचांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय सरपंच संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्ष पदी लक्ष्मण किसन करारे यांची नियुक्ती करण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील काढोली येथील सरपंच लक्ष्मण किसन करारे यांची सर्वानुमते झालेल्या राज्यस्तरीय सरपंच मेळाव्यात नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयराम पलसानिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अमरावती येथील भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, प्रदेशाध्यक्ष प्रमोद पांडुरंग सांगोले यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.

सरपंच लक्ष्मण किसन करारे कामठी तालुक्यातील लोकप्रिय सरपंच सक्रिय कार्यकर्ते असून नागपूर जिल्ह्यातील त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे.राष्ट्रीय सरपंच संघटनेच्या अमरावती येथील राज्यस्तरीय सरपंच मेळाव्यानंतर नागपूर जिल्ह्यातील सरपंचांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले शिवाय प्रत्येक सरपंच जबाबदारीने कार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहे. सरपच लक्ष्मण किसन करारे यांचा अनुभव व कार्य बघता त्यांच्यावर नागपूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि अमरावती जिल्ह्यातील कार्यकारिणीची यावेळी घोषणा करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जयराम पनसालीया, कार्यकारी अध्यक्ष आदित्य उपाध्याय, राष्ट्रीय महासचिव मुकेश सकीया, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके, रामनिवास राठोड, सुखदेव सिगराजी, ईश्वर साहु, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष प्रमोद सांगोले, शुभांगी विठ्ठल पडवळ महिला प्रदेशाध्यक्षा, महाराष्ट्र प्रभारी रामनाथ बोऱ्हाडे , मंगेश तायडे, नवनाथ जोंधळे , डॉ.शंकरराव ठाकरे,राजकुमार मेश्राम, माजी आयुक्त प्रभाकर सरदार, रामनाथ बोऱ्हाडे, नवनाथ जोंधळे, देवेंद्र गेडाम, धर्मेंद्र बोरकर, निखिल काळे, नंदिनी विकास पाटील, सचिन जाधव, जितेंद्र गोंडाणे, आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. सरपंच लक्ष्मण किसन करारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल यांनी अभिनंदन केले

जिल्ह्यातील सरपंचांना एकत्र आणून गावातील विविध विकासात्मक कामे करण्यासाठी प्रशासनान स्तरावरील मागण्या सोडविण्याचा निर्धार सरपंच, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण किसन करारे यांनी व्यक्त केला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

AIR MARSHAL AP SINGH ASSUMES APPOINTMENT OF VICE CHIEF OF THE AIR STAFF

Wed Feb 1 , 2023
New Delhi :-Air Marshal AP Singh PVSM AVSM took over as the Vice Chief of the Air Staff (VCAS) on 01 February 2023. On the occasion of taking over of the office of VCAS, he laid a wreath at the National War Memorial to honour those Armed Forces personnel who have made the supreme sacrifice for the nation. Following this, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!