नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असून जिल्हयातील 12 विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हयाकरीता विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
नागपूर पूर्व, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भोर सिंग यादव (मो.क्र. 8668760145), हिंगणा आणि उमरेड (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी पवन कुमार सिन्हा (8668754564), कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी सुनिल कुमार ( 8421611220) आणि काटोल आणि सावनेर विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कुमार सिंग (8421691220) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित बाबींच्या निरीक्षणाकरिता आलेल्या निवडणूक निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था रवीभवन येथील अनुक्रमे कॉटेज क्र. 3,4, 5 व 6 येथे करण्यात आलेली आहे. निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.