राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कामठी तालुका अध्यक्षपदी दिनेश पाटील यांची नियुक्ती

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या संघटन बळकटीसाठी नुकताच नागपूर येथील शंकर नगर चौकात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा सुनील मगरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या सामाजिक न्याय विभागाच्या कामठी तालुकाध्यक्ष पदी दिनेश हरिदास पाटील यांची नियुक्ती करून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी खासदार सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,धर्मराव बाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री, रूपालि चाकणकर, महिला प्रदेश अध्यक्ष तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग (राज्यमंत्री दर्जा), सुरज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रशांत कदम, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राजेंद्र जैन,माजी आमदार आदी मान्यवर उपस्थित होते.

या नियुक्तीबद्दल नवनियुक्त कामठी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या संघटन बळकटीसाठी सदैव तत्पर राहणार असून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवुन देण्यास कटिबद्ध राहणार असल्याचे मनोगत व्यक्त करीत नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या समस्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा सुनील मगरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ध्यान व ज्ञान म्हणजे बुद्ध आणि शिक्षा - ऍड सचिन चांदोरकर

Wed Nov 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात अश्विन पोर्णिमेपर्यंत धर्म प्रचार करणाऱ्या भिक्खूनी एकाच ठिकाणी राहावे कारण बुद्धांच्या आदेशानुसार धर्म प्रचार करणाऱ्या या भिक्खूना विशेषतः पावसाळ्यात अनेक संकटाचा सामना करावा लागत होता तेव्हा एकाच ठिकाणी राहून वाचनास धम्माचे पठण ,अध्ययन करावे व परिसरातील उपासक आणि उपसीकेना धम्म शिकवण द्यावी तसेच ध्यान व ज्ञान म्हणजे बुद्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com