संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 :- आगामी निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर बहुजन समाज पार्टीने पक्षबांधणी मजबुतीवर जोर दिला असून पक्ष संघटन बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने बहुजन समाज पार्टी चे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी नुकतेच कामठी शहर तसेच कामठी विधानसभा कार्यकारीणी जाहीर केली.जाहीर कार्यकारीनीनुसार कामठी शहराध्यक्षपदी बसपा चे तरुण तडफदार , निष्ठावंत कार्यकर्ता अनिल कुरील यांची नियुक्ती करण्यात आली तर कामठी विधानसभा अध्यक्षपदी इंजिनियर विक्रांत मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.
जाहीर कार्यकारीनी नुसार बसपा कामठी शहराध्यक्षपदी अनिल कुरील, उपाध्यक्षपदी अमित भैसारे, महासचिवपदी रवी मधूमटके, कोषाध्यक्ष विकास रंगारी तर सचिवपदी संतोष यादव यांची निवड करण्यात आली.
तर कामठी विधानसभा अध्यक्षपदी इंजिनियर विक्रांत मेश्राम, उपाध्यक्षपदी चंद्रगुप्त रंगारी, महासचिवपदी अशोक गजभिये, कोषाध्यक्षपदी चंद्रशेखर पाटील, सचिवपदी रुपेश बाम्हणे यांची नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीबद्दल नवनियुक्त शहराध्यक्ष अनिल कुरील व आदी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी बसपा चे समस्त पक्षश्रेष्ठींसह जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांचे मनपूर्वक आभार मानले असून पक्षसंघटन बळकटीकरण व पक्ष मजबुतीसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.या नियुक्ती बद्दल नवनियुक्त अध्यक्ष अनिल कुरील तसेच आदी नवनियुक्त पदाधिकाऱ्यावर बसपा कामठी चे पदाधिकारी , कार्यकर्तानी अभिनंदनाचा वर्षाव केला.
बसपा कामठी शहराध्यक्षपदी अनिल कुरील यांची नियुक्ती
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com