– राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर स्पर्धाचे आयोजन..
– विजयी शेतकर्यांना आकर्षक बक्षिसे.
नागपूर :- पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावेत यासाठी कडधान्य व गळीत धान्य पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी दिली.
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विजयी शेतकऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस देण्यात येईल. तालुका पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे तीन हजार रुपये, तर तिसरे बक्षिस दोन हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार रुपये तर तिसरे बक्षिस 5 हजार रुपये आहे.
राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार तर तिसरे बक्षिस 30 हजार रुपये आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, मुंग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या अकरा पीकांसाठी अर्ज सादर करायचा असून स्वतंत्र्य सर्वसाधारण् गटासाठी 300 रुपये व आदिवासींसाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आहे. शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एका पेक्षा जास्त पीकासाठी सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्वत:च्या शेतावर भात पीकांच्या किमान 20 आर व इतर पीकांच्या किमान 40 आर ( एक एकर क्षेत्रावर) सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदीवासी गटासाठी तालुका स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य जिल्हा तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेता शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल.
इच्छुक शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यात प्रपत्र-अ ठरवून दिलेले प्रवेश शुलक् भरल्याचे चलन 7/12, 8 अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदीवासी असलयास) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 7/12 वरील घोषीत केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/ पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यानी दिली.