यवतमाळ :- अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रासह परीपुर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावयाचे आहेत. स्वाधार योजनेंतर्गत शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेशित असेल त्याच विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्जाची नोंदणी करुन विहीत कालावधीच्या आत परीपुर्ण भरलेला अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.