छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित 

नागपूर :- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी मार्फत ‘छत्रती शिवाजी महाराज सारथी’ जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थांकडून महाविद्यालयातील मुला मुलींसाठी वसतिगृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्था निवडीचे पात्रता निकष अटी शर्ती या सारथी संस्थेच्या http://sarthimaharashtragov.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून वर्धा जिल्हयाकरिता 6 जानेवारी 2024 तर नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्याकरिता 8 जानेवारी 2024 तर गोंदिया जिल्ह्याकरिता 11 जानेवारी 2024 अशी आहे. उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी नागपूर (शहर), विभागीय कार्यालय (सारथी) नागपूर, वनामती, नागपूर परिसर येथील इमारत (शरद व ग्रीष्म) व्ही.आय.पी.रोड धरमपेठ नागपूर येथे पाठवावी.

अर्ज करणारी इच्छुक संस्था ही मुंबई विश्वस्त कायदा, 1950 किंवा संस्था नोंदणी कायदा, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेचे 3 वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह असलेल्या खाजगी नोंदणीकृत संस्थांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती जिल्हा वसतिगृह नियंत्रण समिती सारथी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मानसिक रुग्णांकरिता आधार कार्ड शिबिराचे आयोजन

Fri Dec 29 , 2023
नागपूर :- प्रादेशिक मनोरुग्णालय व उडान प्रकल्प यांच्या सयुक्त विद्यमाने मानसिक रुग्णांकरिता आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ६३ रुग्णांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ.सतिश हुमने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आधार केंद्राचे व्यवस्थापक श्रीमान मराठे यांची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेकरिता डॉ.श्रीकांत करोडे, उडान प्रकल्पाचे प्रमुख डॉ.अभिषेक मामर्डे, व्यवस्थापक प्रवीण काकडे, अंकुश मांडरे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com