नागपूर :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयता दहावी) मार्च 2024 च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज सरल डाटाबेसवर भरण्यास 20 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. नियमित शुल्कासह 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत शाळेमार्फत अर्ज भरता येणार आहे.
तसेच पुर्नपरीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard. in या संकेतस्थळावर भरावयाचे आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा, असे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.