“साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” साठी 25 जुलैपर्यंत अर्जाची मुदत

मुंबई : मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” करिता दि. २५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

              मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मार्दीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, २ छायाचित्र, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपला पूर्णपत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), मुंबई गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर दि. २५ जुलै, २०२२ पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय मुंबई शहर उपनगर यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे ३४४ नागरीकांचे रेस्क्यु ; एकुण ९९४ नागरीक सुरक्षीत स्थळी

Fri Jul 15 , 2022
०६ पाळीव प्राणी सुद्धा  रेस्क्यु चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत ३४४ नागरीकांना रेस्क्यु ऑपरेशन अंतर्गत पूरग्रस्त भागातून सुरक्षीतरीत्या बाहेर काढण्यात आले आहे तर एकुण ९९४ नागरीकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे रात्री सुद्धा मोहीम चालवुन रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथील नागरीकांना सुरक्षीतरीत्या बाहेर काढले आहे तसेच पुररपरिस्थिती क्षेत्रामध्ये अडकलेले २ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com