यवतमाळ :- शासनाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी बेरोजगार उमेदवारांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रंथालयाची स्थापना केलेली आहे. ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची पुस्तके, मासfके व वर्तमानपत्रे उमेदवारांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे.
ग्रंथालयाची सेवा पुर्णपणे विनामुल्य असुन या सेवेचा लाभ घेण्याकरीता उमेदवारांनी WWW.ROJGAR.MAHASWAYAM.GOV.IN या वेबपोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी. उमेदवारांनी याआधी नोंदणी केलेली असेल अशा उमेदवारांना परत नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
या संधीचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प.भ. जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०७२३२-२४४३९५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष कार्यालयास भेट द्यावी, असे कौशल्य विकास विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.