यवतमाळ :- या रब्बी हंगामात अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांच्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी गहू, हरभरा, करडई, जवस या पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीकस्पर्धेमध्ये अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत ३१ डिसेंबर आहे. पिक स्पर्धेत निवडलेल्या पिकांच्या निमित्ताने हंगामानुसार पिक वाढीच्या समस्या लक्षात याव्यात, प्रत्यक्ष उत्पादन पद्धतीचा अभ्यास करता यावा तसेच प्रयोगशील शेतकरी यांना मिळालेल्या उत्पादक्तेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव करुन त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन राज्याच्या उत्पादनामध्ये मोलाची भर पाडण्याच्या उद्देशाने तालुका स्तरावरुन पिकस्पर्धा राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने ३१ डिसेंबर पुर्वी स्पर्धेतील हंगामनिहाय पिकांकरीता अर्ज भरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी जे. आर. राठोड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषिसहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.