कोणताही पुतळा आता राणांना वाचवू शकत नाही

भाजप व रवी  राणांनी केला शिवरायांचा अवमान – प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर
अमरावती -महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री राजापेठ उड्डाणपुलावर बसवला आणि महापालिकेने काल उत्तर रात्री तो तिथून काढून टाकला. पुतळा बसवणे आणि पुतळा हटवणे हे दोन्ही प्रकार शिवरायांचा अवमान असून यास भाजपा समर्थक आमदार रवी राणा आणि महापालिकेत सत्ता असलेली भाजपा संपूर्णतः जबाबदार असून शिवरायांच्या अववामानाबद्दल आता रवी राणा व भाजपाने  माफी मागावी असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून पुतळा बसविण्यासाठी परवानगी देणे  किंवा पुतळा हटवणे हे महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पुतळा हटवण्याचे पाप भाजपचेच असून ,या सर्व प्रकारास भाजपच जबाबदार आहे म्हणून भाजप समर्थीत आमदार रवी राणा व भाजपाने जाहीर माफी मागावी अशी मागणी दिलीप एडतकर यांनी केली आहे.
 मध्यरात्री शिवरायांचा पुतळा बसवणारे आमदार रवी राणा व महापालिकेत सत्ता भाजप पुतळा हटाव प्रकरणी जबाबदार असून त्यांनी शिवरायांचा अवमान केला आहे अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता असून महापालिकेने हा पुतळा हटवला असे असताना भाजप व भाजपचे समर्थित आमदार रवी राणा पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांच्यावर पुतळा हटाव प्रकरणी टीका करीत आहेत हा अव्वल दर्जाचा निर्लज्जपणा असून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपनेच हा पुतळा हटवला असे असताना पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद आहे.
   आमदार रवी राणा शिवरायांचा पुतळ्यावरून अत्यंत स्वस्त राजकारण करीत असून विझण्याआधी दिवा जसा  जास्त फडफडतो तसे रवी राणा यांचे झाले असून आता कोणताही पुतळा रवी राणा यांना वाचवू शकत नाही असे सांगून शिवरायांचा भव्य पुतळा अमरावती महानगरात उभारण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल असे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

बसपा ने दक्षिण नागपुरात जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली

Mon Jan 17 , 2022
नागपूर – महापौर बनाओ अभियान अंतर्गत दक्षिण नागपुर बसपाने आज चंद्रमणी नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागोराव जयकर, नागपूर जिल्हा महिला प्रभारी वर्षाताई वाघमारे, माजी नगरसेवक अजय डांगे, नागपूर शहर प्रभारी शंकर थुल, नागपूर शहर महासचिव विलास मून, दक्षिण नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com