– मनपा आणि प्यार फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
चंद्रपूर :- भटक्या व मोकाट कुत्रांचा नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी शहरातील सर्व भटक्या व पाळीव कुत्र्यांना अँटी रेबीज लस (एआरव्ही) देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशनच्या संयुक्त वतीने २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज डेनिमित्त अँटी रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे.
कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे असते. ऍनिमल बर्थ कंट्रोल रुल २०२१ (डॉग्स) नुसार अँटी रेबीज कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर शहरातील सर्व भटक्या व मोकाट गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका व प्यार फाउंडेशनच्या वतीने कुत्र्यांना अँटी रेबीज लस दिली जाणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी गांधी चौक,२२९ रोजी देगो तुकुम प्राथमिक शाळा व २९ सप्टेंबर रोजी बंगाली कॅम्प चौक येथे सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहे.या शिबिरांमध्ये भटक्या व पाळीव प्राण्यांची नोंदणी तसेच लसीकरण व त्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.आपल्या पाळीव कुत्र्यांना लस देण्यासाठी स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंदरे (7028882889) व कुणाल महल्ले (९४४६८२१८३१) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. या मोहिमेत प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापेल्ली, कुणाल महले, अर्पित सिंग ठाकूर, विनोद डोंगरे, ओम जयस्वाल सेवा देणार आहेत.